वैद्यकीय प्रवेशाबाबत दिलासा नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

मराठा आरक्षणाबाबत नव्या अध्यादेशामुळे वैद्यकीय प्रवेशात अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला तत्काळ दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाबाबत नव्या अध्यादेशामुळे वैद्यकीय प्रवेशात अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला तत्काळ दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामाजिक-आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणातून प्रवेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच नकार दिला. या निकालावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. परंतु, मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने प्रवेशाबाबतचा अध्यादेश जारी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no relief for medical admission