कोंडीतून दिलासा नाहीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

ठाणे - किमान एक महिन्यासाठी मुलुंड आणि ऐरोली पुलावरील टोलनाक्‍यावर लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र अद्यापही या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने अवजड वाहनांचा वेग त्यामुळे कमी होत आहे. त्याचा फटका बसून सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी काही प्रमाणात अनुभवावी लागत आहे. त्यामुळे टोलबंदीच्या पहिल्या दिवशी तरी केवळ टोलमाफीचा आनंदच वाहनचालकांना मिळाला आहे.

सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते दहादरम्यान टोलनाक्‍यावरील वाहतूक कोंडी जीवघेणी ठरते आहे. त्यातही टोल कंपनीकडून कितीही वेगवान कारभाराचा दावा केला जात असला तरी येथील संथ कारभार हा वाहनचालकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या महिनाभरापासून मोठ्या वाहतूक कोंडीला मुलुंड आणि ऐरोलीच्या टोलनाक्‍यावर वाहनचालकांना सामोरे जावे लागत होते. मुंब्रा येथील बायपास दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आल्याने अवजड वाहनांचा सारा भार द्रुतगती महामार्ग आणि ऐरोली पुलावर आला आहे. त्यामुळे  वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

कोंडीला खड्डेमुक्तीचा उतारा आवश्‍यक
टोलबंदी केली असली तरी मोठ्या प्रमाणात वाहनचालकांना  वाहतूक कोंडीतून दिलासा मिळालेला नाही. कोपरी पुलावरील अरुंद रस्त्यामुळे येथे वाहतूक कोंडीत अडकलेली वाहने एकाच वेळी टोलनाक्‍यावर येत असल्याने वाहतूक कोंडी कायम राहिली  आहे. त्यातच येथील रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे अवजड वाहनांचा वेग मंदावत आहे. त्यामुळे अवजड वाहनांच्या रांगाच रांगा लागल्यानेही वाहतूक कोंडीचा फटका बसतो आहे. अशा वेळी किमान टोलच्या परिरातील रस्ते खड्डेमुक्त केल्याशिवाय येथील वाहतूक कोंडीला उतारा मिळणार नसल्याचे मानले जात आहे.

Web Title: There is no relief from traffic