इमानला अबुधाबीला नेण्याची दाट शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सैफी रुग्णालयातील डॉक्‍टरांशी प्रकृतीबाबत चर्चा
मुंबई - इमान अहमद या जगातील सर्वाधिक वजनाच्या महिलेला अबुधाबीला नेले जाण्याची शक्‍यता आहे.

बुधवारी अबुधाबी येथील सैफी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी इमानची तपासणी केली आणि "व्हीपीएस हेल्थकेअर'मधील डॉक्‍टरांशी तिच्या प्रकृतीबाबत चर्चा केली.

"व्हीपीएस हेल्थकेअर'चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक शमशीर वायलील यांनी यापूर्वी संपर्क साधला होता. इमानला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यास तिच्यावरील उपचारांसाठी इजिप्त आणि भारतातील डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवता येणार नाही. त्यासाठी व्हीपीएस हेल्थकेअर हा चांगला पर्याय असेल. त्यामुळे तेथील डॉक्‍टरांशी संपर्क साधला, असे तिची बहीण शायमा हिने सांगितले.

शायमाने पत्रकारांना सांगितले की, येथील डॉक्‍टरांनी इमानवर उपचार केले. मात्र, तिची ढासळणारी प्रकृती हाताळण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा नाही. ते तिच्या डिस्चार्जची तारीखही सांगत नाहीत. त्यांनी अचानक तिला डिस्चार्ज दिला, तर तिला कुठे व कसे नेणार? इमानच्या प्रकृतीबाबत भारत किंवा इजिप्तमधील कोणत्याही डॉक्‍टरांवर माझा विश्‍वास नाही, असे शायमा म्हणाली.

शायमाने माफी मागावी
इमानची बहीण शायमा हिने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना इमानची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर बिघडल्याचे सांगितले होते. इमानचे वजन कमी झाले नसून डॉक्‍टर तिला आवश्‍यक उपचार देण्याचे टाळून इजिप्तला परत पाठवत असल्याचा आरोप तिने केला होता. या आरोबाबाबत शायमाने लेखी माफी मागावी, अशी मागणी डॉक्‍टरांनी केली आहे. डॉ. अपर्णा भास्कर यांच्या इमानवर उपचार न करण्याच्या निर्णयाचे इतर डॉक्‍टरांनी समर्थन केले आहे.

Web Title: There is a possibility of taking Imran to Abu Dhabi