पार्थ पवारांच्या ड्रायव्हरच्या अपहरणाचे प्रकरण गूढच!

satpute
satpute

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा ड्रायव्हर मनोज सातपुते याने आपले मुंबईतील कुलाबा परिसरातून अपहरण झाल्याचा केलेल्या दाव्याबद्दल पोलिसांना प्रथम दर्शनी संशय वाटत असल्याचे सांगण्यात आले. त्याने केलेल्या दाव्याची पडताळणी कुलाबा पोलिस करीत आहेत.

अपहरणाची घटना ही 5 जुलैला घडल्याचे मनोज सातपुते यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पाच जुलै रोजी कुलाबा येथे उभा असताना ओमनी व्हॅनमधून काही लोक माझ्याजवळ आले. पार्थ पवार यांना भेटायचे आहे. त्यांच्याकडे घेऊन चल, असे सांगत त्यांनी मला ओमनीमध्ये बसविले. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर मी बेशुद्ध पडलो. शुद्ध आली तेव्हा मी अहमदनगरच्या पारनेरमधील सुपे येथे होतो, असे सातपुतेंने तक्रारीत उल्लेख केला आहे.

पुणे-नगर महामार्गावरील सुपे येथे रस्त्याच्या कडेला अपहरणकर्त्यांनी मला सोडले. शुद्धीवर आल्यावर मी पुणे जिल्ह्यातील सणसवाडी या माझ्या गावी गेलो आणि दुसऱ्या दिवशी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

शिक्रापूर पोलिसांनी शून्य क्रमांकाचा अपहरणाचा गुन्हा दाखल करून तो मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. कुलाबा पोलिसांनी सातपुते यांची चौकशी केली असून सातपुते यांच्या अपहरणा मागे नेमके कोणते गौडबंगाल आहे, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तांत्रिकदृष्टया या गुन्ह्याचे कागदपत्र पोलिस मुख्यालयातच आहेत. पण आम्ही याप्रकरणी प्राथमिक तपासाला सुरूवात केली आहे. त्यात सुपेंच्या दाव्याची पडताळणी सुरू असून याबाबत कायदेशीर सल्ला पोलिस घेत आहेत. तसेच त्याच्या जखमा हा त्याने स्वतःच केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com