उल्हासनगर पालिकेत भरदुपारी धुराच्या मॉक-ड्रिलचा थरार

There was a fire in Ulhasnagar municipality
There was a fire in Ulhasnagar municipality

उल्हासनगर - बाहेर कडाक्याचे ऊन, अधिकारी-कर्मचारी कामात मग्न, त्यात पहिल्या मजल्यातील गॅलरीतून धुराचा लोट बाहेर पडू लागला. पालिकेत आग लागल्याची ओरड होऊ लागतात सर्वांची पळापळ सुरू झाली. अग्निशमन दल, सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. अवघ्या दिड मिनिटात पालिकेची इमारत खाली करण्यात आली. नंतर हा तर धुराच्या मॉक-ड्रिलचे प्रात्यक्षिक होते हे समजल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

राज्यभरात जागतिक आपत्ती धोके निवारण दिवसानिमित्त (मॉक-ड्रिल) प्रात्यक्षिक आयोजित करण्याच्या सूचना राज्यशासनाने महापालिकांना दिलेल्या आहेत. 9 ते 13 तारखेपर्यंत मॉक-ड्रिल चे आयोजन करायचे आदेश होते. मात्र उद्या 13 तारखेला सुट्टी असल्याने पालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्या नेतृत्वाखाली आजच मॉक-ड्रिल सादर करण्यात आला. त्यात उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर, नगररचनाकार मिलिंद सोनावणी, शहर अभियंता महेश सितलानी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी, जनसंपर्क अधिकारी विनोद केणे, सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com