ड्रेनेजमध्ये गुदमरून तीन सफाई कामगारांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

सिडकोच्या कंत्राटदारासह दोन कामगारांचा ट्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे.
 

पनवेल: सिडकोच्या कंत्राटदारासह दोन कामगारांचा ट्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे.

पालिका हद्दीतील काळुंद्रे परिसरात सायंकाळी घडलेल्या घटनेत मुख्य होलमध्ये उतरलेल्या दोन सफाई कर्मचाऱ्यांसहीत कंत्राटदार विलास म्हसकर यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुख्य होलमध्ये अडकलेल्या तिघांचे शव बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असुन, वैद्यकीय तपासणीसाठी तिघांचे शव तालुका ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

त्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ड्रेनेजमध्ये तयार झालेल्या विषारी वायुत गुदमरुन ही घटना घडली. पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमंन दलाला घटनास्थळी पाचारण करुन तीघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे ड्रेनेज 40 ते 50 फूट खोल आहे.

तिघांच्या मृत्यूस सिडकोला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. मृतामध्ये कंत्राटदार विलास म्हसकर, कामगार संतोष वाघमारे आणि आणखी एका कामगाराची ओळख पटलेली नाही. 

Web Title: Theree workers including CIDCO contractor, stutter death in Manhole