थर्माकोल मखरांची राज्याबाहेर विक्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई - यंदाच्या गणेशोत्सवासाठी मागील वर्षी ऑक्‍टोबरपासूनच थर्माकोलची मखरे बनवलेल्या व्यावसायिकांची यंदा आलेल्या थर्माकोलबंदीमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. यावर मार्ग म्हणून तयार माल आता राज्याबाहेर गोवा, गुजरातमधील घाऊक वितरकांकडे पाठवला जात आहे; पण तरीही राज्यभरातील मखर व्यावसायिकांचे 40 ते 50 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. राज्य सरकारच्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या थर्माकोल व्यावसायिकांना तेथेही यश आले नाही. त्यामुळे तयार मालाचे करायचे काय, हा पेच त्यांच्यापुढे होता. थर्माकोलला पर्याय म्हणून याच व्यावसायिकांनी कार्ड बोर्डचे इको फ्रेंडली मखर बाजारात आणले; पण आमच्या नुकसानाची भरपाई देणार कोण? असा त्यांचा सरकारला सवाल आहे. राज्यात थर्माकोलवर बंदी असली तरी सरकारने राज्याबाहेर थर्माकोलची मखरे विकण्यास मुभा दिली आहे.
Web Title: Thermocol Makhar Sailing in Out of State