प्राणी माणसाला मानसोपचार कसे देतात हे तुन्हाला माहितीये का ?

पाळीव प्राण्यांना माणसाची देहबोली, चेहऱ्यावरील भाव आणि आवाज समजतो. त्यामुळे ते त्याच पद्धतीने प्रतिक्रिया देतात व माणसाला भावनिक आधार मिळतो. त्यामुळे ही उपचारपद्धती अत्य्ंत उपयुक्त ठरत आहे.
These animal assisted interventions (AAIs)
These animal assisted interventions (AAIs)google

मुंबई : मानसिक आरोग्य चांगले नसल्यास मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याची पद्धत सर्वांनाच माहीत आहे; मात्र पाळीव प्राण्यांकडून मानसोपचार घेण्याची पद्धत अजूनही आपल्यासाठी नवीन आहे.

These animal assisted interventions (AAIs)
स्वप्नील मानसोपचार घेत होता:मेडिकल कॉलेजचा दावा;पाहा व्हिडीओ

अॅनिमल असिसस्टेड इंटरव्हेन्शन्स ही उपचारपद्धती अलीकडच्या काळात सर्व वयोगटांतील रुग्णांसाठी लाभदायक ठरत आहे. पाळीव प्राण्यांच्या सहवासातून त्यांच्याशी निर्माण होणाऱ्या नात्यामुळे मानवी आयुष्य सुखकर होते, माणसाची मन:स्थिती सुधारते. याचाच अर्थ, कुत्रे, मांजरी आणि इतर पाळीव प्राणी माणसाचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

रुग्णालये, वृद्धाश्रम, शाळा, विद्यापीठे, तुरूंग आणि पुनर्वसन केंद्रे, इत्यादी ठिकाणी राहण्यासाठी पाळीव प्राणी माणसाला मदत करतात असे गेल्या साधारण दहा वर्षांत दिसून आले आहे. कॅनडातील Royal University Hospital Emergency Department in Saskatchewan येथे २०१६ सालापासून कुत्र्यांमार्फत स्वागत केले जाते.

प्राण्यांच्या सहवासाची ही उपचारपद्धती कितपत प्रभावी आहे हे जाणून घेण्यासाठी नुकताच एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांपैकी ७० टक्के जण असे होते जे रुग्णालयात खाट मिळण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांना नियमित वैद्यकीय सेवेसोबतच १० मिनिटे कुत्र्याच्या सहवासात ठेवण्यात आले.

उपचारपद्धती सुरू करण्यापूर्वी, संपल्यानंतर आणि त्यानंतर २० मिनिटांनी स्वयंसेवकांचे परीक्षण करण्यात आले. यानुसार त्यांच्या वेदना, अस्वस्थता आणि नैराश्य यांच्यात घट झालेली दिसून आली आणि त्यांचे आरोग्य सुरळीत होऊ लागले. कुत्र्यांशी संबंधित उपचारामुळे रक्तदाब आणि स्पंदने कमी होण्यासही मदत होते.

कुत्र्यांप्रमाणे मांजरीही माणसाचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. मांजरींच्या सहवासामुळे मन:स्थिती सुधारते आणि एकटेपणाची जाणीव नाहीशी होते. मांजरीचा स्पर्श, तिला मिठी मारणे, इत्यादी गोष्टींमुळे विशेषकरून लहान मुले आणि वृद्धांमध्ये शांतप्रवृत्ती वाढीस लागते. नैराश्यात असताना मांजरीच्या आवाजामुळे भावनिक आधार मिळत असल्याचे दिसून आले आहे.



वयोमानानुसार विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या वृद्धांच्या बाबतीत एक अभ्यास करण्यात आला. यातील काही वृद्धांना आठवड्यातून तीन वेळा असे सहा आठवडे मांजरीचा सहवास देण्यात आला. या रुग्णांमध्ये नैराश्याची लक्षणे आणि रक्तदाब कमी झालेला दिसून आला.

मानसिक आरोग्य आणि वर्तन समस्या जाणवणाऱ्या तरूण रुग्णांवर घोड्याचे उपचार लाभदायक ठरत असल्याचे समोर आले आहे. या उपचारांदरम्यान या तरुणांना घोड्यांशी संवाद कसा साधावा आणि त्यांच्याशी कसे बोलावे याचे प्रशिक्षण मिळाले.

सामाजिक संपर्क वाढवणे आणि नातेसंबंध तयार करणे माणसाच्या सामाजिकरणाच्या प्रक्रियेचा एकम महत्त्वाचा भाग आहे. पाळीव प्राण्यांना माणसाची देहबोली, चेहऱ्यावरील भाव आणि आवाज समजतो. त्यामुळे ते त्याच पद्धतीने प्रतिक्रिया देतात व माणसाला भावनिक आधार मिळतो. त्यामुळे ही उपचारपद्धती अत्य्ंत उपयुक्त ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com