हा घ्या पुरावा, राष्ट्रवादीचे 'हे' आमदार थेट निघाले होते दिल्लीला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील राजकीय ड्रामा मोठ्या जोराशोरात सुरु आहे. अशात आता राष्ट्रवादीचे काही आमदार दिल्लीला जाणार असल्याची माहिती आता समोर येतेय.

महाराष्ट्रातील राजकीय ड्रामा मोठ्या जोराशोरात सुरु आहे. अशात आता राष्ट्रवादीचे काही आमदार दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्सच्या प्रायव्हेट चॉपरने हे आमदार मुंबईहून दिल्लीला जाणार होते. आता त्यांच्या तिकीटाची प्रत समोर येतेय. दरम्यान, दुपारी अडीच वाजताची वेळ ही या आमदारांची दिल्लीला रवाना होण्याची वेळ होती. 

यातील तीन आमदार हे आता परत आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान बाकीचे आमदार अद्याप कुठे आहेत? याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. थोड्याच वेळात राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत यापैकी कोण कोण उपस्थित राहतायत हे देखील पाहावं लागेल.  

 

No photo description available.

 

राज्यात झालेल्या राजकीय भूकंपात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या चार आमदारांपैकी केवळ संदीप क्षीरसागर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. संदीप क्षीरसागर हे शरद पवारांकडे परत आल्याचं पाहायला मिळालं. त्यानी शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र राष्ट्रवादीचे मोठे नेते धनंजय मुंडे अजूनही नॉट रिचेबल आहे. आज सकाळी राजकीय महाभारत पाहायला मिळालं. अजित पवार यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय. 

Webtitle :  these mlas were planning to go to delhi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these NCP mlas were planning to go to delhi