राष्ट्रवादीचे 'हे' सात आमदार परतले..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय.

"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादीचे काही आमदार हे अजित पवार यांच्यासोबत होते. सकाळी अजित पवार यांच्यासोबत  माणिकराव कोकाटे, नरहरि झिरवाळ, धंनजय मुंडे, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, सुनील शेळके, संदिप क्षिरसागर, दिलीप बनकर, अनिल पाटील हे आमदार होते. यांच्यातील सात आमदार आता परतल्याचं समजतंय. 

हे आमदार परतलेत : 

  1. संदीप क्षीरसागर
  2. राजेंद्र शिंगणे
  3. सुनील शेळके
  4. सुनील भुसारा
  5. नरहरी जिरवार
  6. अनिल भाईदास पाटील
  7. माणिकराव कोकाटे 

दरम्यान दिलीप बनकर आणि धनंजय मुंडे हे अद्यापही कुठे आहेत याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्सच्या प्रायव्हेट चॉपरने हे आमदार मुंबईहून दिल्लीला जाणार होते. आता त्यांच्या तिकीटाची प्रत समोर येतेय. दुपारी अडीच वाजताची वेळ ही या आमदारांची दिल्लीला रवाना होण्याची वेळ होती. मात्र आता यातील सात आमदार राष्ट्रवादीकडे परतले असल्याचं समजतंय. 

Webtitle : these seven MLAs are now back to NCP two still not reachable


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these seven MLAs are now back to NCP two still not reachable