नवी मुंबई : वाशीतील गेहना ज्वेलर्स या दुकानातून तब्बल एक कोटी रुपये किमतीचे अडीच किलो सोने चोरणाऱ्या फरारी आरोपीला पकडण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे. गोपालसिंग सोलंकी असे या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक करत त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत.

वाशी, सेक्टर- 14 मध्ये अशोक सोहनलाल बडोला यांचे गेहना ज्वेलर्स नामक तयार सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान असून त्यांच्या दुकानात गोपाल सोलंकी हा नोकर म्हणून कामाला होता. सोलंकी हा अनेक वर्षांपासून बडोला यांच्याकडे कामाला असल्याने बडोला यांचा त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे मागील आठवड्यात बडोला हे दुकानाची जबाबदारी गोपाल याच्यावर सोपवून धार्मिक कामानिमित्त आपल्या मूळ गावी राजस्थानला येथे गेले होते. दरम्यान 10 नोव्हेंबर रोजी गोपाल सोलंकी याने नेहमीप्रमाणे दुकान उघडले; मात्र सायंकाळी दुकान बंद करताना अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपये किमतीचे दागिने चोरून पलायन केले.
संबंधित माहिती दुकानाचे मालक बडोला यांना मिळताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक परितोष शिऊरकर यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला गोपाल हा राजस्थानमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राजस्थानमध्ये दाखल झालेल्या वाशी पोलिसांच्या पथकाने राजस्थानच्या राणी तालुक्यात गोपाल याला अटक करत त्याच्याकडून सर्व दागिने हस्तगत केले.
web title : thief arrested for stealing jewelery from Vashi