वाशी खाडीवर तिसरा पूल लवकरच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई - वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील नवीन मार्गिकेचे बांधकाम, सायन-पनवेल मार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देऊन एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असेल. नवीन सागरी सेतूपासून पश्‍चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था केली जाईल. तसेच वांद्रे बस स्थानकावरून जोडणारा नवीन रस्ता पश्‍चिम द्रुतगती मार्गावरून (पार्ले जंक्‍शन) वर्सोवा नाना-नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. 

द्रुतगती मार्गावर नवीन मार्गिका
खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोल नाक्‍यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणाऱ्या दोन टप्प्यातील बोगद्यांचे व त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलांच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची लांबी ११ किलोमीटर असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन किलोमीटर आहे. 

Web Title: Third bridge on vashi khadi