मुंबईत आजपासून 'थर्ड आय' महोत्सव

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सवाला गुरुवारपासून (ता. 15) सुरवात होत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रभादेवी येथे सायंकाळी सात वाजता या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. या सोहळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा सोहळा 15 ते 22 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. इराण, नेपाळ, जपान, बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम आदी देशांतील चित्रपट येथे दाखवले जातील. पुण्यातील आशय फिल्म क्‍लबचे संस्थापक सचिव सतीश जकातदार यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. या महोत्सवात लघुपटही दाखवण्यात येतील.

Web Title: third eye mahotsav in mumbai