मधुचंद्रावेळी कळले, प्रेयसी पुरुष आहे! 

मधुचंद्रावेळी कळले, प्रेयसी पुरुष आहे! 

मुंबई - वर्षभर प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा विरोध झाला; पण "तो' "तिच्या'मागे ठाम उभा राहिला. लग्नबंधनात दोघे अडकले आणि मधुचंद्राकरिता कुलूमनालीला गेले आणि होत्याचे नव्हते झाले. जीवापाड प्रेम करून जिला आपण आपल्या आयुष्याची अर्धांगिनी बनवली ती आपली प्रेयसी चक्क पुरुष आहे, हे लक्षात आल्यानंतर "त्या' तरुणाच्या पायाखालची वाळूच सरकली. आपली फसवणूक झाल्याचा आरोप करीत त्याने थेट पोलिस ठाणे गाठले. 

गोवंडी येथील 21 वर्षांच्या तरुणासोबत घडलेला हा प्रकार. वांद्रे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एका कार्यक्रमात त्याची 19 वर्षांच्या तरुणीशी ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. घरच्यांनाही दोघांचे प्रेमप्रकरण समजले. त्या वेळी तरुणीच्या पालकांनी लग्नाचा तगादा धरला. वैद्यकीय कारणामुळे मुलगी आई होऊ शकत नाही, असे तिच्या पालकांनी तरुणीच्या पालकांना सांगितले; मात्र प्रेमापुढे सगळ्याच गोष्टी फिक्‍या ठरल्या. लग्नानंतर दाम्पत्य मधुचंद्रासाठी कुलूमनालीला गेले. तेथे मुलीने विविध कारणे सांगत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. सगळी कारणे अपयशी ठरल्यानंतर तिने आपण "व्हर्जिनोप्लास्टी' केल्याचे सांगितले. हे ऐकून तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली; मात्र याबाबत कुणाला सांगितल्यास आत्महत्या करू, अशी धमकीही तिने दिल्याने तरुण घाबरला. 

मानसिक तणावात त्याने काही दिवस कसेबसे ढकलले; मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने याबाबत घराच्यांना सांगितले. त्यांनी तरुणीच्या घराच्यांना जाब विचारला; मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत घटस्फोटाचा आग्रह धरला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

कब्रस्तान हॉलमध्ये लग्न 
जानेवारीत लग्नाची तारीख ठरली. त्याच वेळी तरुणीच्या घराच्यांनी सीएसटी येथील न्यू हज कमिटी येथे हॉलही बुक केला होता; मात्र लग्नाच्या 15 दिवसांपूर्वी त्यांनी काही कारणास्तव लग्न तिथे होत नसल्याचे कळवले. ऐनवेळी तरुणीच्या वडिलांनी माहीम येथील कब्रस्तान हॉलमध्ये लग्नसोहळ्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नातेवाईक नाराज होते, असेही तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. 

संबंधित तरुणाने आमच्याकडे तक्रार केली आहे. चौकशीनंतरच या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येईल. 
- दीपक पगारे,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com