तिसरी राष्ट्रीय शिक्षक परिषद पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई - बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणातही बदल होणे अपेक्षित आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी तिसरी राष्ट्रीय शिक्षक परिषद (नॅशनल टीचर्स कॉंग्रेस) पुण्यात 4 ते 6 जानेवारीदरम्यान होणार आहे. "उच्च शिक्षणाकडे झेपावताना' या विषयावर भर असलेली ही परिषद पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात होईल.

या परिषदेत जगभरातील 25 आणि देशातील 20 तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, पाच हजारांहून अधिक प्राध्यापक सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. परिषदेत अनेक प्राध्यापक शोधनिबंध सादर करणार असून, विविध विषयांवर चर्चासत्रे होतील. ही देशातील पहिलीच मल्टीडिसिप्लिनरी परिषद ठरेल, अशी माहिती नॅशनल टीचर्स कॉंग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. सुधीर गव्हाणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Third National Teacher Conference in Pune