मुंबईत तापमानाची पस्तिशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

मुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी महिन्यातील हे चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. वाढलेल्या तापमानामुळे थंडीत उन्हाळा सुरू झाल्याचे जाणवू लागले आहे.

सध्या सकाळची थंडी कमी झाली आहे. दुपारी सूर्य डोक्‍यावर आल्यानंतर उन्हाच्या झळा बसू लागतात. गेल्या आठवड्यापासून तापमानवाढीचा अनुभव मुंबईकरांना येऊ लागला आहे. सुरुवातीला किमान तापमान १५ अंशांवरून १९ अंशांवर वाढले. दोन दिवसांपूर्वीच किमान तापमान पुन्हा १६ अंशांवर आले. किमान तापमानात चढ-उतार सुरू असतानाच कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते; मात्र आता कमाल तापमानात ३५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे.

अगोदरच किमान तापमानात चढ-उतार होत असताना कमाल तापमानातही वाढ झाल्याने थंडीसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जमिनीवरून वाहणारे उष्ण वारे सध्या जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे सध्या तापमानात वाढ नोंदवली जात आहे. 
- के. एस. होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते

Web Title: Thirty five temperature in mumbai