सीएम चषक स्पर्धेत सहभागी होणार तीस हजार विद्यार्थी

सीएम चषक स्पर्धेत सहभागी होणार तीस हजार विद्यार्थी

कल्याण - राज्यभरात सीएम चषक स्पर्धेची धूम सुरू असून कल्याण-डोंबिवली शहरातही या स्पर्धेचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सुमारे तीस हजार विद्यार्थी आणि युवक या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कल्याण जिल्ह्यातील सर्व स्पर्धचे नियोजन नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर भोईर यांनी केले आहे. कल्याण डोंबिवलीतील चार विधानसभा क्षेत्रात हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम, रांगोळी,नृत्य, खो-खो, क्रिकेट आदी विविध प्रकारात ही स्पर्धा संपन्न होणार असून यामुळे विषेश करून  ग्रामीण पट्ट्यातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कल्याण पूर्वेत या स्पर्धेला सुरवात झाली आहे. स्थानिक  शिक्षकवृंद स्पर्धांसाठी सहकार्य करणार आहेत.

ग्रामीण तसेच शहर पातळीवरील स्पर्धेतून यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप सोहळा 12 जानेवारी, 2019 रोजी म्हणजे स्वामी  विवेकानंद यांच्या जयंतीचे दिवशी “राष्ट्रीय युवा दिनी” नागपूर येथे होणार असल्याची माहीती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी  भाजपा जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार रमेश पाटील, नगरसेवक मोरेश्वर भोईर, जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, शशिकांत कांबळे, नगरसेवक राहूल दामले, मंडल अध्यक्ष नंदू परब, संजीव बिडवाडकर आदी उपस्थित होते.

युवा वर्ग चार भिंतीच्या आत कोंडला न जाता मैदानी खेळ आणि बौद्धिक गरज ओळखून शक्तिमान युवक घडविण्याचा उद्देश ‘सीएम चषक’ स्पर्धेचा आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धेची तयारी सुरू असून युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे
-मोरेश्वर भोईर, जिल्हा अध्यक्ष,भा.ज.यु.मो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com