lockdown : मुळगावी जाऊ इच्छिणाऱ्यांना असा मिळणार परवाना, गर्दी टाळण्यासाठी पोलिसांची शक्कल

lockdown
lockdown

ठाणे : लॉकडाऊनमुळे हजारोंच्या संख्येने परप्रांतातील मजूर व कामगार राज्यात अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या राज्यात, मुळगावी रवाना करण्यासाठी ठाणे पोलिसांनी शक्कल लढवली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळनिहाय पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, संबधित क्षेत्रातील पोलीसांनी झुंबड टाळण्यासाठी गटप्रमुख (ग्रुपलीडर) नेमून त्यांच्यामार्फत कागदपत्रे गोळा करून वैयक्तिक वाहनांने जाण्यासाठी पासेस दिले जाणार आहेत. 

मुळगावी जाण्यासाठी पासेसची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने इच्छुकांनी covid19.mhpolice.in या संकेतस्थळाचा वापर करावा, किंबहुना अपवादात्मक स्थितीत गटप्रमुखाच्या माध्यमातून (फक्त एकाच व्यक्तीने )विहीत नमुन्यात मायग्रेंट पासेस सेलकडे ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे.

नागरिकांना पोलिसांच्या संबधीत संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती सादर करावी लागणार असून अपवादात्मक स्थितीत गटप्रमुख नेमुन ऑफलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. स्थलांतर करणाऱ्या इच्छुकांनी नोंदणीकृत अधिकाऱ्याकडील इन्फ्लुएंझाची लक्षणे नसल्याबाबातचे प्रमाणपत्र सदर अर्जासोबत जोडणे आवश्यक असुन मुळगावी जाणाऱ्या व्यक्तीच्या समूहाने वाहनांची व्यवस्था स्वतःच करावयाची आहे. तसेच, संबधीत व्यक्तीचा सध्याचा पत्ता कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर, त्या व्यक्तीला कंटेनमेंट कालावधी संपेपर्यत पास मिळणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रक्रिया ?
मुळगावी निघालेल्या व्यक्ती अथवा समुहाला पोलीस ठाण्यात covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अपवादात्मक स्थितीत गटप्रमुखाला ऑफलाईन अर्ज करता येईल. या अर्जामध्ये कोणत्या वाहनाने जाणार आहे, त्या वाहनांचा क्रमांक, कितीजण प्रवास करणार आहेत, कुठुन-कुठे प्रवास करणार, कधी प्रवास करणार तसेच नोंदणीकृत डॉक्टरांचा तपासणी अहवाल याचा तपशील द्याावा लागणार आहे. त्यानंतर तो अर्ज त्या विभागातील पोलीस उपायुक्तांकडे जाणार आहेत. त्यावर अंतिम निर्णय होऊन त्या त्या क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक संबधित गटप्रमुखाना संपर्क करुन प्रवासासंदर्भात पुढील सुचना देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये उडाली झुंबड
लॉक डाऊन काळात गावी जाण्याची संधी मिळत असल्याचे कळताच ठाण्यातील कळवा, मुंब्रा, वर्तकनगर आदी पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी स्थलांतरीत नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसुन आले.

Those going to village will get such a pass, the police will be able to avoid the crowd

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com