सावित्रीच्या लेकींसाठी महापालिकेचा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नवी मुंबई - सावित्रीच्या लेकींसाठी नवी मुंबई महापालिकेने आता पुढाकार घेतला आहे. त्यात पालिका शहरात एक हजार वटवृक्ष लावणार आहेत. नवी मुंबईत सध्या तीन हजार वटवृक्ष आहेत. वटपौर्णिमेबरोबरच त्याचे इतरही नैसर्गिक फायदे असल्यामुळे वटवृक्षांच्या लागवडीवर पालिका भर देणार आहे. 

शेकडो वर्षांच्या आयुर्मानामुळे वडाला पर्यावरणात महत्त्वाचे स्थान आहे. अवाढव्य रूंद खोड, लोंबकळणाऱ्या पारंब्या, नेहमी हिरवेगार पाने, जमिनीत खोलवर व दूरवर पसरलेली मुळे अशी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. या झाडाबाबत हिंदू धर्मात अनेक आख्यायिका आहेत. नागरीकरणाच्या ओघातही महापालिकेने या झाडांकडे लक्ष दिल्याने शहरात दोन हजार 727 वटवृक्ष आहेत. एक हजार वटवृक्षांची लागवड केली जाणार असल्याने त्यात आणखी भर पडेल, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांनी दिली. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 1 जुलैपासून केल्या जाणाऱ्या रोपलागवडीत हजार वडाची झाडेही लावण्यात येणार आहेत. 

वडाच्या झाडांची संख्या 
ऐरोली - 120 
बेलापूर - 363 
दिघा - 70 
घणसोली - 492 
कोपरखैरणे - 408 
नेरूळ - 561 
तुर्भे - 399 
वाशी - 314 
एकूण - 2727 

Web Title: thousand trees will be planted in the navi mumbai