Mumbai News : मुंबईत इंडीयन मुजाहिदीन संघटनेच्या नावाने दहशतवादी हल्ल्याची धमकी; आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Threat of terrorist attack Indian Mujahideen organization in Mumbai accused arrested police

Mumbai News : मुंबईत इंडीयन मुजाहिदीन संघटनेच्या नावाने दहशतवादी हल्ल्याची धमकी; आरोपी अटकेत

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर फोन करून दहशतवादी हल्ल्याची धमकी सोमवारी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात 27 वर्षीय आरोपी इरफान शेखला सहार पोलिसांनी 24 तासात चेंबूर येथून अटक केली आहे.

अशा प्रकारे मुंबईत घातपात घडवण्याच्या धमकीच एकाच आठवड्यात हे दुसरे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ला करू, असा धमकीचा ई-मेल चार दिवसांपूर्वी 3 फेब्रुवारी रोजी एनआयए या तपास यंत्रणेच्या मुंबई स्थित कार्यालयात पाठवण्यात आला होता.

विमानतळावर कॉलने धमकी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअरपोर्ट काॅन्टेक सेंटरच्या संकेत स्थळावर सोमवारी रात्री 10 वाजता च्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. फोन करणार्या व्यक्तीने स्वत:चे नाव इरफान अहमद शेख असे सांगितले होते.

फोनवरील व्यक्तीने तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत संशयास्पद कोड भाषेत संवाद साधत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेनंतर संपूर्ण तपास यंत्रणा अलर्ट झाली. दरम्यान या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात 505(1) भादवी कलमांतर्गग गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास सुरू झाला.

पोलीस तपास

सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर धमकीचा फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस पथक तयार करण्यात आले. तांत्रिक पुराव्याचे विश्लेषणाच्याआधारे धमकीचा फोन करणाऱ्या इसम चेंबुर येथे असल्याचे पोलिसाना लक्षात आले. त्वरित करावी करत चेंबुर येथून पोलिसांनी 24 तासात आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

आठवड्यात दुसरी धमकी

मुंबईत घातपात घडवण्याच्या धमकीच एकाच आठवड्यात हे दुसरे प्रकरण आहे. मुंबईवर हल्ला करू, असा धमकीचा ई-मेल चार दिवसांपूर्वी 3 फेब्रुवारी रोजी 'एनआयए' ला आला होता. तालिबानच्या नावाने ही धमकी देण्यात आली होती. तालिबानचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांनी आदेश दिला. त्यानंतर हा मेल पाठवल्याचे धमकी देणाऱ्याने ई-मेलमध्ये म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

'एनआयए'ला आलेल्या धमकीनंतरच मुंबईत अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली होती. मंत्रालय, महत्त्वाची कार्यालये, स्टॉक एक्स्चेंज, हॉटेल ताज, सिद्धविनायक मंदिर, बाबूळनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, उच्च न्यायालय, हाजीअली दर्गा, पंचतारांकित हॉटेल आदी ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासह इतर ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.