ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना धमकीचा फोन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

ठाणे:  मुंबईतील डोंगरी येथून दाऊदचा माणूस बोलतोय, "तुम्ही ठाण्यात खूप भांडणे करता, व्यवस्थित राहत नाही. तुम्ही नीट राहिला नाहीत, तर तुमच्या कुटुंबीयांना त्रास देऊ. तुम्ही तुमच्या हिशोबात राहायचे', असा धमकीचा फोन महापौर मीनाक्षी शिंदे यांना मंगळवारी रात्री आला. याप्रकरणी महापौर शिंदे यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवली आहे. कापूरबावडी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने महापौरांना मोबाईलवर आलेल्या धमकीच्या फोनने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. झपाट्याने निर्णय घेणाऱ्या महापौर मीनाक्षी शिंदे यांची प्रतिमा डॅशिंग महापौर अशी बनली आहे. दरम्यान, त्यांनी ही बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गाफील राहू नका, असा सल्ला दिल्याने महापौरांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सदरचा मोबाईल नंबर ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती दिली. 

मंगळवारी रात्री हा फोन आला. आज पुरुषार्थ संपत चालल्याचे दिसत आहे. एका महिला महापौराला दाऊद किंवा छोटा शकीलचे हस्तक धमकावतात, ही निंदनीय बाब आहे. मी कुणाला घाबरत नाही. दाऊदच्या हस्तकांमध्ये हिम्मत असेल तर त्याने समोर येऊन धमकी द्यावी, मी महापौर म्हणून निर्भीडतेने काम करत आहे. माझे कुणाशीही वैर झाल्याचे मला आठवत नाही. पोलिस त्यांच्या दृष्टीने तपास करीत आहेत. 
- मीनाक्षी शिंदे (ठामपा महापौर) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatened phone to Thane Mayor Meenakshi Shinde