भुरट्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतिचे वातावरण

अच्युत पाटिल
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

बोर्डी : बोर्डी परिसरात घरफोडी आणि भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरु झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे. तात्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बोटचेपे धोरणामुळे असामाजिक प्रवृत्तीना बळ मिळल्याने चोरट्यांचे फावते झाले असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

बोर्डी : बोर्डी परिसरात घरफोडी आणि भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरु झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे. तात्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बोटचेपे धोरणामुळे असामाजिक प्रवृत्तीना बळ मिळल्याने चोरट्यांचे फावते झाले असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

घोलवड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील झाई-बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वहिंद्रा(दर्जीपाडा) येथे शनिवारी ता.18 ऑगस्ट रात्री संदिप हरिश्चंद्र ठाकुर यांच्या घराची मागिल खिडकीची लोखंडी ग्रिल तोडून घरातील सामानाची नासधूस करुन सुमारे आठ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी पळविल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या पाच दिवसातच ठाकुर यांच्या घरापासुन अवघ्या शंभर मिटर अंतरावरील अरुण म्हात्रे यांच्या घराचा मागिल बाजुचा दरवाजा लोखंडी पाईच्या साह्याने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याना यश आले नाही.

पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुन्ह्याचे प्रमाण कमी दाखविण्यासाठी लहासहान गुन्ह्याची दखल तात्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी न घेतल्याने या भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. सालकल, मोटरसायकल, मोटरसायकलच्या टाकीतील.
 पॅट्रोल, शेती बागायतितील हत्यार, वीजपंप, पिव्हीसी पाईप, ठिबक सिंचन संच, फळे-भाजीपाला, नारळ, वीजेचे दीवे, इलेट्रालनिक वस्तूच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परंतू तात्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बोटचेपे धोरणामुळे गुन्ह्याच्या नोंद करण्यात पोलिसांनी दाखवलेली उदासिनतेमुळे चोरटे सुसाट सुटले आहेत. असा आरोप करण्यात येत आहे.

घोलवड पोलिस ठाण्यात नुकतेच रुजु झालेले पोलिस निरीक्षक संग्राम यादव यांनी या घटनेची गंभिर दखल घेतली असुन गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस अधिकारी गावीत व हाडळ यांचेकडे तपासकाम सोपविण्यात आले.

Web Title: threatens villagers due to thieves