esakal | ठाण्यात रस्ता एक, अपघात तीन; उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला ५० फूट खाली...
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात रस्ता एक, अपघात तीन; उड्डाणपुलावरून कंटेनर 50 फूट खाली कोसळला

ठाण्यातील घोडबंदर रोडवर दिवसभरात तीन अपघात झाले. शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक मार्गावरील सर्वात मोठ्या आणि वळणदार असलेल्या माजिवाडा उड्डाणपुलावरून औषधाने भरलेला भलामोठा कंटेनर वरून थेट पुलाखाली कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला. पहाटे पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

ठाण्यात रस्ता एक, अपघात तीन; उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला ५० फूट खाली...

sakal_logo
By
दिपक शेलार

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवर दिवसभरात तीन अपघात झाले. शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक मार्गावरील सर्वात मोठ्या आणि वळणदार असलेल्या माजिवाडा उड्डाणपुलावरून औषधाने भरलेला भलामोठा कंटेनर वरून थेट पुलाखाली कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला. पहाटे पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. गायमुख जकातनाका आणि जे. कुमार यार्डनजीक विविध दोन अपघातांच्या घटना सकाळी 10 ते 11 या कालावधीत घडल्या. या सलग तीन अपघातांमुळे घोडबंदर रोडवर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याबाबत कापूरबावडी आणि कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचली का? ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महादेव चौघुले यांचे निधन

घोडबंदर रोडवरून औषधाचे खोके भरून नाशिकच्या दिशेने 40 फुटी कंटेनर निघाला होता. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने माजिवडा उड्डाणपुलावरून हा कंटेनर 50 ते 60 फूट खाली थेट वाहतूक पोलिस चौकीसमोरील रस्त्यावर कोसळला. या अपघातात गंभीर जखमी झालेला चालक आझादी याचा जागीच मृत्यू झाला. या पुलाखालील रस्त्यावर वाहने नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. आधीच अवघड वळण असलेल्या या पुलावर पावसामुळे मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी एक दुचाकीदेखील पुलावरून खाली कोसळल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला होता. कापूरबावडी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबई पोलिसांच्या नव्या कुल बाईक पाहिल्यात का? ताफ्यात आल्या 250 सीसी स्पोर्ट्स बाईक्स

दुसऱ्या एका घटनेत सकाळी पावणे दहाच्या सुमारास घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा मिक्‍सर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने गायमुख वळणावर उलटला. हा ट्रक कॉंक्रिटने भरलेला असल्याने संपूर्ण रस्त्यावर कॉंक्रिट पसरले होते. वाहतूक शाखा व ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील राडारोडा साफ करून रस्ता मोकळा केला. तिसरा अपघात याच परिसरात पावणे अकराच्या सुमारास घडला. भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने एक कार दुभाजकावर जाऊन उलटली. 
-----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

loading image
go to top