मुंबई-पुणे महामार्गावर तीन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

खोपोली : मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी रात्री विविध ठिकाणी लागोपाठ तीन अपघातांच्या घटना घडल्या. आडोशी बोगद्याजवळ रस्त्यावर ऑईल सांडल्याने 4 ते 5 गाड्यांचा अपघात झाला. यात कोणतीहीजीवितहानी झाली नसली, तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय काही तास मोठी वाहतूक कोंडी झाली, तर रात्री बर्फाच्या ट्रकचा अपघात होऊन यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

बबन किसन मगर (वय 21, रा. पारनेर, अहमदनगर) असे मृताचे नाव आहे. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यातील राजू भाऊ थोरात यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळी 8 च्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ रस्त्यावर ऑईल सांडल्याने मुंबईकडे येणाऱ्या 4 ते 5 गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Web Title: Three accidents on Mumbai Pune Express way; one dead