मुंबई : कोचीन येथे कोस्टल रोड बांधण्याचे कंत्राट देण्याचे प्रलोभन दाखवून तीन कोटी ६५ लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या भामट्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बनावट ‘व्हीआयपी’ स्टीकर वाहनावर लावले होते. तरविंदर सिंग सब्रवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुजरातमधील वापी येथील अलाईड स्पेअर्स अँड ऑटो पार्टस मॅन्युफॅक्चर कंपनीत वाहनाचे वायपर तयार केले जातात. या उद्योजकाशी संबंधित उद्योजकाने तक्रार केली आहे.

सब्रवाल याने केरळमधील कोचीन येथे किनारी मार्ग प्रकल्पात २० किलोमीटरचा रस्ता बांधण्याचे कंत्राट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले होते. याबाबत करार करून त्याने तीन कोटी ६५ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार संबंधित उद्योजकाने केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.