गोरेगावमधील आगीप्रकरणी तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - गोरेगावमधील टेक्‍निक प्लस या इमारतीला रविवारी लागलेल्या आगीप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या इमारतीत एका खासगी कंपनीचे कार्यालय आहे. त्या कंपनीचे मालक नितीन कोठारी यांनी सातव्या व आठव्या मजल्यावरील कार्यालयातील लाकडी सामान तेथून काढण्यास सांगितले होते. हे सामान कार्यालयातून बाहेर काढत असताना शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी कोठारी तसेच तेथे सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या रमजान खान (21) व सलीम मणियार (35) यांना अटक केली आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 

Web Title: Three arrested in Goregaon fire