खारगरमध्ये ओढ्यात बुडून चार महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

गजानन चव्हाण 
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

खारघर गोल्फ कोर्स शेजारील डोंगरातील एका धबधब्यात चार विद्यार्थी पावसाच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शनिवार सकाळी अकराच्या सुमारास घडली. चार पैकी तिघांचा मृतदेह  हाती लागला असून एका तरुणीचा शोध सुरू आहे. 

खारघर : खारघर गोल्फ कोर्स शेजारील डोंगरातील एका धबधब्यात चार महाविद्यालयीन विद्यार्थी पावसाच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शनिवार सकाळी अकराच्या सुमारास घडली. चार पैकी तिघांचा मृतदेह  हाती लागला असून एका तरुणीचा शोध सुरू आहे. या सर्व विद्यार्थींनी नेरूळ येथील एसआयईएस महाविद्यालयातील आहे.
      
 पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातल्याने मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील पर्यटक परिवारासह खारघर सेक्टर सहा गोल्फ कोर्स शेजारी असलेल्या डोंगरातून झिरपणाऱ्या छोटमोठ्या धबधब्याचा धारेत तर काही जवळच असलेल्या ओढ्यात पावसाचा आनंद घेतात. गोल्फ कोर्स आणि डोंगरलगत सिडकोने उभारलेल्या ड्रायविंग रेंजमध्ये  वाहने उभी करण्याची सोय असल्यामुळे आणि या परिसरात पर्यटकांना मोकळी देण्यात आल्यामुळे   शनिवार रविवार पर्यटकांची वर्दळ असते. 

शनिवार सकाळी नऊच्या सुमारास पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तरुणाईच्या दोन गटात जवळपास नऊ तरुण-तरुणी होत्या. त्यात एका गटात नेहा अशोक जैन (रा.चेंबूर नाका आणि त्यांचा मित्र तर, दुसऱ्या गटात   आरती नायक (रा.नेरूळ) नेहा दामा (रा.कोपर खैरणे ) श्वेता(रा. ऐरोली) आणि श्वेता नायर यांचा समावेश होता.  

शुक्रवार रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ड्रायविंग रेंज  आणि धमोळा पाडाच्या मध्यभागी दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यातील पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे पाचही तरुणी वाहून गेल्या त्यातील श्वेता नायर बचावल्या तर, इतर चौघी वाहून गेल्या. त्यातील नेहा आणि आरतीचा मृतदेह हाती लागले असून  नेहा दामा,श्वेता नंदी या दोघींचा शोध खारघर अग्निशमन दलाचे जवान घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तीदार यांनी सांगितले. 

खारघर मधील पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात सात तरुणी वाहून गेल्याची माहिती समाज माध्यमातून प्रसिद्ध होताच खारघर पोलीस आणि खारघर अग्निशमन दलातील जवानांनी शोध कार्य सुरु तर, पनवेलनवी मुंबई परिमंडल दोनचे पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेतला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three boys missing, three rescued and one girl died drowning in canal at kharghar