तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकाला सोमवारी (ता. २७) हवाई गुप्तचर विभाग (एआययूने) अटक केली. चेचे लुलू हुबर्ट असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. 

सोमवारी एआययूचे अधिकारी विमानतळावर गस्त घालत असताना टांझानियाचा रहिवासी असलेला चेचे हुबर्ट जोहान्सबर्गमार्गे मुंबईत आला. सहार विमानतळावर उतरल्यावर चेचेच्या हालचाली एआययूच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. त्याच्या बॅगेची अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता त्यात ३००७ ग्रॅम एम्फेटामाईन अमली पदार्थ सापडले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे तीन कोटी इतकी आहे. चेचेने ट्रॉली बॅगच्या खाली अमली पदार्थ लपवले होते. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. चेचे अमली पदार्थ मुंबईत कोणाला देणार होता, त्याला तस्करीच्या मोबदल्यात काही रक्कम मिळाली होती का आदी गोष्टींचा तपास एआययूचे अधिकारी करत आहेत.

Web Title: Three crore seized drugs