वसईत तीन कोटींच्या विदेशी सिगारेट जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

नालासोपारा : कोट्यवधी रुपये किमतीच्या विदेशी सिगारेटची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीला वालीव पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. विदेशी सिगारेटचे तब्बल 150 बॉक्‍स पोलिसांनी या वेळी जप्त केले असून भिवंडीमार्गे एका ट्रकमधून ही अवैध वाहतूक करण्यात येत होती.

राज्यात या सिगारेटच्या विक्रीसाठी परवानगी नाही. त्यामुळे हे सिगारेटचे बॉक्‍स नेमके कुठे विकले जाणार होते याचा आता पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. वसईत यापूर्वी गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट समोर आले होते; मात्र आता विदेशी सिगारेट विक्रीचे रॅकेट समोर आल्याने शहरात पुन्हा एकदा अवैध धंद्यांना पेव फुटल्याचे समोर आले आहे.
 
Web Title: Three crores of foreign cigarettes seized in Vasai

टॅग्स