कोपरखैरणेतील तीन दहीहंडी रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - मराठा आंदोलनादरम्यान कोपरखैरणे परिसरात झालेल्या जाळपोळ प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर कोपरखैरणेतील तीन दहीहंड्या आयोजकांनी यंदा रद्द केल्या आहेत. नवी मुंबईतील समन्वय बैठकीत दहीहंडी आयोजकांनी ही घोषणा केली आहे.

मराठा आंदोलनावेळी कोपरखैरणेत दंगलसदृश्‍य परिस्थिती उद्‌भवली होती. त्यानंतरही दोन गटांमधील तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत दहीहंडी उत्सवात घातपात होऊ नये म्हणून खबरदारीसाठी आयोजन रद्द केल्याचे आयोजकांनी सांगितले. 

मराठा समाजातर्फे २५ जुलैला पुकारण्यात आलेल्या बंदला कोपरखैरणेत हिंसक वळण लागले होते. नवी मुंबईत मराठा आंदोलनाच्या निमित्ताने वादाची बिजे रोवली  गेली. त्यामुळे दहीहंडी, गौरी-गणपती, दसरा-दिवाळी या सणांदरम्यान पुन्हा वाद होऊ नये, म्हणून पोलिसांनी समन्वय बैठक बोलवली होती. यावेळी सामंजस्याने तीन मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचे ठरविले. 

खबरदारीचा उपाय म्हणून कोपरखैरणेतील दहीहंडी आयोजन रद्द करण्याचा पर्याय पोलिसांनी मंडळांना सूचवला होता. त्याला काही मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आणखी काही मंडळांच्या आम्ही संपर्कात आहोत.
- डॉ. सुधाकर पाठारे, पोलिस उपायुक्त-परिमंडळ -१

Web Title: three dahihandi cancelled in koparkhairne