ठाण्‍यातील तिघांचा नदीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

टिटवाळा - खडवली येथील भातसा नदीवर सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हे तिघेही तरुण ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात राहणारे आहेत. त्‍यांचे मृतदेह हाती लागले आहेत. 

रोशन कामत (३०), सूरज उदय सिंह (३०), राजेश शेरसिंग रयटा (३५) अशी या तरुणांची नावे आहेत. ते खडवलीच्या नदीवर एक दिवसाच्या सहलीचा आनंद घेण्यासाठी आपल्या इतर सात मित्रांसोबत गेले होते. नदीपात्रात अंघोळ करताना वाहत्या पाण्याचा आणि नदीतील खोलीचा अंदाज न आल्याने यात एक जण वाहून जाऊ लागला. त्या वेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोघेही या वेळी बुडाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिस व कल्याण अग्निशमन दल तात्‍काळ दाखल झाले. 

अग्‍निशमन दलाच्‍या जवानांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रयत्न करूनही त्यांचे मृतदेह आढळून आले नाहीत. सकाळी शोध घेतला असता त्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले असून, पोलिस याबाबत तपास करत आहेत.

Web Title: three death in river drown