बनावट कागदपत्रांद्वारे जामीन देणाऱ्या तिघांना अटक 

बनावट कागदपत्रांद्वारे जामीन देणाऱ्या तिघांना अटक 

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या साह्याने जामीन मिळवून देणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. किशोर चुंबके, कल्पेश नरेश कालबोरे आणि नंदू सिद्धे गौडा अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांनाही न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात यापूर्वी आठ जणांना पोलिसांनी अटक केली होती. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून जामीन देणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरात ही टोळी कार्यरत होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून आठ जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत किशोर, कल्पेश आणि नंदूचे नाव समोर आले. ते तिघेही मुंबईबाहेरील व्यक्तींना जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहायचे. त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळायचे. 

व्यावसायिक महिलेची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक 
मुंबई : व्यावसायिक महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विकास माणिकराव तेडके आणि गॅबरिल उर्फ रॉबी फ्रान्सिस स्वामी अशी त्या दोघांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com