ठाणे-बेलापूर रोडवर तीन उड्डाणपूल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवी मुंबई  - ठाणे-बेलापूर मार्गावरील नेहमीच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची व प्रवाशांची सुटका होणार आहे. या मार्गावर एमएमआरडीए बांधत असलेल्या तीन उड्डाणपुलांचे काम नव्या वर्षात पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. 

नवी मुंबई आणि ठाण्याला जोडणारा ठाणे-बेलापूर हा रस्ता महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गाच्या एका बाजूला नागरी वस्ती, तर दुसऱ्या बाजूला औद्यागिक वसाहत आहे. ठाणे-पुणे प्रवासासाठीही हाच मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएने तीन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. घणसोली, तळवली नाका व सविता केमिकल येथे पुलांची कामे सुरू असल्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या उड्डाणपुलांची कामे पूर्ण होत आली आहेत. घणसोलीत 1.4 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. सविता केमिकल येथील उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. महापे सर्कलवरील सिग्नलमुळे वाहनचालकांना ताटकळत उभे रहावे लागते; परंतु यावरही पर्याय काढला आहे. महापे सर्कल येथे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. ते वर्षाअखेर पूर्ण होणार असल्याने या मार्गावरची वाहतूक कोंडी सुटणार आहे.

Web Title: Three flyovers in Thane-Belapur Road