डोंगरी बालगृहातून तीन मुलींचे पलायन 

अनिश पाटील 
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

मुंबई : डोंगरी बालगृहातून तीन मुलींनी पलायन केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 2) उघडकीस आला. 15 फुटांची भिंत ओलांडून या मुलींनी बालगृहातून पलायन केल्याचे समोर आले असून, यापैकी एकीला पकडण्यात आले आहे. तर दोघी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

मुंबई : डोंगरी बालगृहातून तीन मुलींनी पलायन केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 2) उघडकीस आला. 15 फुटांची भिंत ओलांडून या मुलींनी बालगृहातून पलायन केल्याचे समोर आले असून, यापैकी एकीला पकडण्यात आले आहे. तर दोघी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

डोंगरी बालगृहात या मुली ज्या ठिकाणी राहत होत्या, तेथे सुरक्षा भिंतीच्या टोकावर बाहेरच्या बाजूने एका झाडाची फांदी आली आहे. याच साह्याने त्या तिन्ही मुलींनी पळ काढल्याचे समजते. या मुलींनी चार बांबू आणि तीन ओढण्यांच्या साह्याने एक लहान शिडी बनवली; मात्र सुरक्षा भिंत ओलांडता येत नसल्याने त्यांनी चार ते पाच खुर्च्या एकत्र केल्या. त्यावर शिडी ठेवत त्यांनी भिंतीवर चढून फांदीच्या साह्याने पळ काढला. सायंकाळी मोजणीच्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. यापैकी एक मुलगी बोरिवलीला आपल्या घरी आली असता घरच्यांनी प्रवेश नाकारल्याने तिला पुन्हा पोलिसांच्या हवाली करण्यात आले; मात्र अन्य दोघी फरार आहेत. या दोन्ही मुली 17 वर्षांच्या आहेत. त्यातील एक मूळची बिहार व दुसरी तमिळनाडू येथील रहिवासी आहे. याबाबत वरिष्ठपोलिस निरीक्षक संदीप भागडीकर यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोर देत मुलींचा शोध सुरु असल्याचे सांगितले. 

साबणावरून स्पेशल होममधील मुलाला भोसकले 
साबणावरून झालेल्या वादातून बलात्कार व हत्येच्या गुन्ह्यातील दोषी मुलाने दुसऱ्या मुलाला चाकूने भोसकल्याचा प्रकार शनिवारी (ता. 3) डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूलमध्ये घडला. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याप्रकरणी या मुलाला ताब्यात घेतले आहे. 17 वर्षीय आरोपी मुलगा हा कल्याण येथील रहिवासी असून, त्याच्याविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले होते. जखमी मुलावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: Three girls escape from Childrens Home in dongrai