दहिसरमध्ये तीन घरे कोसळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

दहिसर - पूर्वेकडील रावळपाडा भागातील एन. जी. पार्क परिसरात सोमवारी (ता. ९) रात्री तीन घरे कोसळली. बाळू मामा मंदिराजवळील घरे संरक्षक भिंतीला लागूनच बांधण्यात आली होती. त्यातील तीन घरे कालच्या पावसात कोसळली. घरात कुणी नसल्याने जीवितहानी टळली.

सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या तब्बल ३० फूट उंचीच्या बांधकामाची तक्रार सोसायटीच्या रहिवाशांनी पालिका आर/उत्तर विभागाकडे केली होती. इमारतीलगतच्या बांधकामामुळे रहिवासी त्रस्त होते; मात्र पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. त्यातील एका घरात रुमालाचा कारखाना सुरू होता. घरे पडल्याने नुकसान झाल्याने पुन्हा एकदा बेकायदा बांधकामाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पूर्वेकडील केतकीपाडा, खान कम्पाऊंड, भटेचाळ, हनुमान टेकडी आदी भागांत पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्‍यता असते. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आज दुपारपर्यंत राडारोडा काढण्यात आला. 

बीपीटी कंटेनर रोड पाण्यात
शिवडी - अवजड वाहनांच्या दळणवळणासाठी वापरण्यात येणाऱ्या शिवडी, कॉटन ग्रीन येथील बीपीटी कंटेनर रोडवर  संततधारेमुळे दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने अवजड वाहनांना वाहतुकीदरम्यान मोठी कसरत करावी लागत आहे.

Web Title: Three houses collapsed in Dahisar