मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार 

प्रमोद पाटील 
रविवार, 8 जुलै 2018

इनोव्हा कारची मोटारसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यु झाला. 

मुंबई - अहमदाबाद हायवेवर हालोली येथे भीषण रविवारी (8) सकाळी साडे सहा च्या सुमारास अपघात झाला असून इनोव्हा कारची मोटारसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यु झाला.  

मृतांमध्ये निखील काशिनाथ मेधवले, वय 28 मुलगा (रा. दामखींड),कामिनी काशिनाथ मेधवले, वय 55 आई (रा. दामखींड), पुर्मय पाटिल (वय18) (रा. गोवाडे) (निखीलचा भाचा) यांचा समावेश आहे. 

निखिल मुंबईच्या दिशेने मोटारसायकल वरून जात असताना मागून भरधाव येणाऱ्या इनोव्हाने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत तिघेही जागीच ठार झाले.

सदर अपघाताची मनोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धबा जायभाये अधिक तपास करत आहेत. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three killed in a accident on Mumbai Ahmedabad highway