तरुणाची तीन लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये चांगल्या पदावर नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. 

तक्रारदार तरुण बोरिवली परिसरात राहतो. तरुणाची गेल्या डिसेंबरमध्ये आरोपीशी ओळख झाली होती. तक्रारदार नोकरीच्या शोधात असल्याचे आरोपीला कळताच आरोपीने तरुणाला चांगल्या पदावर आणि अधिक पगाराची नोकरी देतो, असे सांगितले. माझगाव येथे शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये नोकरी असल्याचे सांगून आरोपीने तरुणाकडून तीन लाख रुपये घेतले; मात्र मुदतीत नियुक्तिपत्र दिले नाही. वारंवार विचारणा केल्यावर आरोपींनी टाळाटाळ केली. याबाबत तरुणाने बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

Web Title: Three lakh cheating in mumbai

टॅग्स