तीन लाख घरे विक्री प्रतीक्षेत!

तीन लाख घरे विक्री प्रतीक्षेत!

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे दोन लाख ९३ हजार घरे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याशिवाय तब्बल २८ हजार २८५ घरांचे बांधकाम सुरू असल्याचा अहवाल ‘प्रॉपटायगर’ या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

जुलै ते सप्टेंबर या काळात सुमारे २१ हजार ९८५ घरांची विक्री झाली. त्यापैकी ८३ टक्के म्हणजे १८ हजार १९७ घरांचे बांधकाम सुरू आहे. ‘रेडी टू मूव्ह इन’ या प्रकारातील सुमारे ३६८८ घरांची विक्री झाली आहे. या घरांच्या किमती २५ ते ७८ लाख रुपये असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बांधकामाला नुकतीच सुरुवात झालेल्या ८१०० पैकी ७० टक्के घरांच्या किमती २५ ते ७५ लाख रुपयांदरम्यान असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई महानगर परिसरातील एक लाख १६ हजार २७० घरांचा ताबा २०२० पर्यंत देण्यात येईल. त्यातील ४५ टक्के घरे परवडणाऱ्या गटातील आहेत. पुण्यातही मार्च २०२० पर्यंत ताबा मिळणाऱ्या घरांची संख्या ६३ हजार २७१ असून, त्यापैकी ५८ टक्के घरे परवडणारी आहेत. एकूण १७ हजार ७६० घरे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.

‘रेरा’ कायद्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात कठोर नियमावली राबवली जात आहे. त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या घरांबाबत ग्राहक जास्त उत्सुकता दाखवत आहेत.
- ध्रुव अगरवाला, प्रॉपटायगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com