'आर्थर रोड'मधील तीन कैद्यांना माफी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

मुंबई - महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने 100 कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आर्थर रोड तुरुंगातील तीन कैद्यांचा समावेश आहे. गांधी जयंतीनिमित्त मुंबई सर्वोदय मंडळाने आज घेतलेल्या विशेष कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. या वेळी गांधीजींचे जीवन व कार्याबद्दल व्याख्यान झाले. मंडळाचे कार्यकर्ते प्रेमशंकर तिवारी व कमलेश गांधी यांनी 150 कैद्यांना मार्गदर्शन केले.

शिक्षा माफ झालेल्या बंदींना मंडळातर्फे गांधीजींचे "सत्याचे प्रयोग' हे पुस्तक भेट देण्यात आले. आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक हर्षद अहिरराव म्हणाले की, आजच्या परिस्थितीत गांधी विचारांना पर्याय नाही. गांधी विचार अधिकाधिक बंदींपर्यंत पोचविण्याची गरज आहे. शिक्षेत सवलत मिळालेल्या तीनही बंदींनी सुटकेनंतर गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालणार असल्याचे निवेदन केले.

Web Title: Three prisoners apologized in arthur road jail