परळीत विषबाधेने तीन बकऱ्या दगावल्या

अमित गवळे
रविवार, 1 एप्रिल 2018

सुधागड तालुक्‍यातील परळी येथे तीन बकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्री 2 वाजता घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी येथील रूपेश जाधव यांच्या एकूण 15 बकऱ्या आहेत.

पाली : सुधागड तालुक्‍यातील परळी येथे तीन बकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्री 2 वाजता घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी येथील रूपेश जाधव यांच्या एकूण 15 बकऱ्या आहेत. या बकऱ्यांचे संगोपन व निगा राखण्याचे काम ते परळी-घोटवडे मार्गावरील वाड्यात करीत आहेत. 

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध तांदळात मिसळून बकऱ्यांपुढे ठेवले. 15 बकऱ्यांपैकी तीन बकऱ्यांचा ते खाल्ल्याने मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच पशुपालक रूपेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन विषारी औषध दूर केल्यामुळे अन्य 12 बकऱ्यांचे प्राण वाचले. या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली. याआधी पाच दिवसांपूर्वी पाली सावंत आळी येथील वनिता पाटील यांच्या पाच बकऱ्या अचानकपणे दगावल्या होत्या. त्यामुळे सुधागड तालुक्‍यातील पशुपालक घाबरले आहेत. 

Web Title: Three Ships have been dead in parli