तीन हजार इमारती अग्निसुरक्षेविना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबईतील तीन हजार इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव आहे. अग्निशमन दलाने केलेल्या इमारतींच्या फायर ऑडिटमध्ये ही गंभीर बाब उघड झाली आहे. इमारतींमधील अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेचे तीनतेरा झाल्याने क्रिस्टल आगीसारख्या घटना घडत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. 

क्रिस्टल आगीत चार जणांना प्राण गमवावा लागला. या आगीने पुन्हा फायर ऑडिटचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कमला मिल दुर्घटनेत मोठी हानी झाली. त्यानंतर अग्निशमन दलाने शहर आणि उपनगरांतील इमारतींची तपासणी केली. दलाच्या या तपासणीत तीन हजार इमारतींमध्ये अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या इमारतींना अग्निशमन प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. बहुतांश इमारतींनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सतत आगीच्या दुर्घटना घडत आहेत. अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या इमारतींवर ठोस कारवाई होत नसल्याने इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

फायर ऑडिटकडे दुर्लक्ष 
मुंबईतील इमारतींना नियमानुसार अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. या यंत्रणांची दर सहा महिन्यांनी ऑडिट करून त्याचा अहवाल संबंधित विभागाला सादर करणे आवश्‍यक आहे. अनेक सोसायट्यांचे याकडे लक्ष नाही. सोसायट्यांनी अधिकृत एजन्सींकडून फायर ऑडिट करावे, असा नियम आहे. राज्यभरात अशा ५८८ परवानाधारक एजन्सी आहेत. या एजन्सीपैकी २४० मुंबईभरात आहेत. मात्र अनेक सोसायट्यांकडून ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Three thousand buildings without fire safety in mumbai