विहिरीत पडून तिघींचा मृत्यू

मुंबई - विलेपार्ले येथे विहिरीत पडलेल्या महिलांना वाचवण्यासाठी सुरू असलेले बचावकार्य.
मुंबई - विलेपार्ले येथे विहिरीत पडलेल्या महिलांना वाचवण्यासाठी सुरू असलेले बचावकार्य.

मुंबई - धार्मिक पूजा सुरू असताना कठडा तुटून काही महिला विहिरीत पडल्या. यातील तिघांचा मृत्यू झाला असून सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. रात्री उशिरापर्यंत इतरांचा शोध सुरू होता. विलेपार्लेतील दीक्षित मार्गावर मंगळवारी 8.30च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दीक्षित मार्गाच्या मागील बाजूस रुईया बंगला आहे. तेथील विहिरीच्या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी धार्मिक विधीकरिता काही महिला जमल्या होत्या. अनेक महिला आणि मुले विहिरीच्या कठड्यावर बसले होते. त्या वेळी अचानक कठडा तुटल्यामुळे अनेक महिला विहिरीत पडल्या. हा प्रकार नजीकच असलेल्या काही जणांच्या लक्षात आला.

त्यांनी याबाबत तत्काळ अग्निशामक दलाला कळवले. दुर्घटनेची माहिती कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवून रात्री उशिरा तीन महिलांना विहिरीतून बाहेर काढले. त्यांना सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. माधवी विजय पांडे (वय 49), दिव्या (वय 3), रेणू उदिलाल यादव (वय 20) अशी त्या तिघींची नावे आहेत.

रात्री उशिरा अग्निशामक दलाने आणखी सहा जणांना विहिरीतून बाहेर काढले. त्यातील मेहक गुप्ता (11), चंदा गुप्ता (38), गीता गुप्ता (36), सुमित्रा गुप्ता (47) यांच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com