अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

चिमुरड्याने मुंबई पोलिसांसाठी उभा केला 50 हजारांचा निधी, केक विकून उभी केली रक्कम

मुंबई, ता. 13 :  कोरोनाच्या संकटसमयी अभिनेता अक्षय कुमार, क्रिकेटपटु विराट कोहली यांच्या सारख्या दिग्गजांनी मुंबई पोलिस फाऊडेशनला मदत केली असताना आता एका तीन वर्षांच्या कबीर जैन या मुलाने 50 हजारांची मदत पोलिस फाउंडेशला केली आहे. कबीरने त्याच्या आईच्या मदतीने केक तयार करून हा निधी उभा केला. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीही मंगळवारी कबीरकडून हा धनादेश स्वीकारला.

 

यावेळी कबीरने एक पत्रही पोलिसांना सुपूर्त केलंय. त्यात आमची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. कृपया या वायरसला पकडा आणि तुमच्या बंदुकीने त्याला गोळी घाला. मला माझ्या आजोबा व मित्राना भेटण्यासाठी जायचे आहे. तुम्ही हे औषधं व लॉलीपॉप खरेदी करण्यासाठी वापरू शकता, असे भावनिक पत्रही यावेळी त्याने पोलिसांना दिले आहे. यावेळी या मुलाचे वडील केशव व आई करिष्मा याही उपस्थित होत्या.

No photo description available.

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं उद्योगपतीच्या मुलाला पडलं महागात, थेट जीवावर बेतलं

लॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरातच राहून आपले छंद जोपासत आहेत. पण या छंदातून आपण चांगल्या उपक्रमांसाठी पैसे उभे करू शकतो. हे तीन वर्षाच्या कबीरने दाखवून दिले. बनाना वॉलनट मफीन्स व चॉकलेट कपकेक बनवण्यात आईला मदत करणा-या कबीरने याच छंदाच्या माध्यमातून केक विकून हा निधी उभारला. सुरूवातीला मुंबई पोलिस फाउंडेशनसाठी या कुटुंबाने 10 हजार रुपयांची मदत देण्याचे ठरवले होते. पण केक विक्रीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या कुटुंबाने 35 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. पण सुमारे 25 हजार रुपयांची केक विक्री झाले, तसेच जवळचे आणखी 25 हजार रुपयांची त्यात भर टाकून 50 हजार रुपयांचा धनादेश या कबीरच्या मार्फत मुंबई पोलिसांना देण्यात आला.

Image may contain: 4 people, people sitting, table and indoor

मंगळवारी रात्री त्यांची कोरोना विरोधातली झुंज अपयशी ठरली आणि आणखी एका पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना कबीरची आई बेकरी पदार्थ तयार करायची. कबीरही त्यात रुची घेऊ लागला. आम्हीही त्याला व्यस्त ठेवण्यासाठी त्याला केक बनवण्यासाठी प्रोत्साहीत केले. केकचेही प्रमाण वाढल्यानंतर आम्ही याच्यामाध्यमातून काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मित्राच्या मुलानेही अशा पद्धतीने परदेशात चॅरीटी केली होती. त्याच्यापासून प्रोत्साहित होऊन या केकच्या माध्यमातून चॅरीटी करण्याच आम्ही निर्णय घेतला.

Image may contain: 1 person, food and indoor

कबीरलाही शाळेतून वरळी पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांकडे त्याची ओढ होती, अशातूनच पोलिसांसाठी आम्ही मदत निधी उभारण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडून  सुमारे 30 कुटुंबियांनी केक घेतले. या केकसाठी हे कुटुंबिय किती रक्कम देतील ती रक्कम दुप्पट करून पोलिसांना मदत करण्यात येईल, असे आम्ही स्पष्ट केल्यामुळे अनेकांनी दिलखुलासपण मदत केली, असे कबीरचे वडील केशव जैन यांनी सांगितले. अनेकांनी आमच्याशी संपर्क साधून आगाऊ रक्कही पाठवली आहे. त्यामुळे पुढील काळात सुमारे एक लाख रुपये उभे करण्याचा आमचा मानस अल्याचा जैन यांनी सांगितले.

three year old kid raised fund of rupees fifty thousand by sales of cupcakes for mumbai police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three year old kid raised fund of rupees fifty thousand by sales of cupcakes for mumbai police