तीन वर्ष झाली तरी उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार बेपत्ताच

दिनेश गोगी
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा विषय ठरलेला आहे.

उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा विषय ठरलेला आहे.

संजीव करपे यांनी बेकायदा बांधकाम परवाने दिल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. अशातच पुण्याला नगररचना कार्यालयात तातडीच्या मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त मनोहर हिरे यांनाही मिटिंगसाठी आवर्जून हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार हिरे हे उल्हासनगरातून पुण्याला निघाले. तर संजीव करपे हे त्यांच्या मुंबई निवसस्थानातून ड्रायव्हर सोबत पुण्यासाठी निघाले होते.

मात्र खोपोली येथे आल्यावर करपे यांनी त्यांच्या ड्रायव्हरला कार थांबवण्यास लावली. स्वतःचे पाकीट, मोबाईलआणि बॅग ड्रायव्हरच्या स्वाधीन करून त्याला त्याला कार घेऊन घरी जाण्यास सांगितले. माझा मित्र येत आहे. त्याच्या सोबत पुण्याला जाणार असे म्हटल्यावर ड्रायव्हर कार घेऊन घरी निघून गेला. ड्रायव्हर घरी गेल्यावर आणि करपे यांची बॅग, मोबाईल, पाकिट घरच्यांना सोपवल्यावर घरची मंडळी अवाक् झाली. त्यांनी पुण्याला चौकशी केली असता, करपे हे मिटींगला आलेच नसल्याची माहिती मिळताच घरच्यांच्या पायाखालील वाळू सरकली. उल्हासनगरातही करपे मिटींगला गेलेच नाही हे समजताच नगररचनाकार विभागातील संरचनात्मक अभियंता भूषण पाटील, कनिष्ट अभियंता दीपक ढोले हे रात्रीच खोपोलीला रवाना झाले. 

पोलिस ठाण्यात करपे यांच्या मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आल्यावर सर्व हॉटेल्स लोगिंग बोर्डिंग येथे मॅसेज गेले. पोलिसांनी डोंगर दऱ्या खोऱ्या स्थानिक तरुणांच्या मदतीने पिंजून काढल्या. मात्र करपे कुठेच सापडले नाहीत.

करपे यांच्या परिवाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यांना शोधून काढू असे आश्वासन देण्यात आले. मात्र तीन वर्षे होत आले तरी पोलिसांना मंत्रालयाला करपे यांच्या शोधात अपयश आले असून करपे नेमके आहेत कुठे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three years later, Ulhasnagar municipal corporator's disappeared