आरोपीच्या मृत्यूनंतर पोलिसांवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

धारावी - मोबाईल चोरीप्रकरणी धारावी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाइकांसह शंभर जणांच्या जमावाने सायन रुग्णालय परिसरात पोलिसांवर दगडफेक केली. यात दोन पोलिस व राज्य सुरक्षा मंडळाचे तीन कर्मचारी जखमी झाले. 

याप्रकरणी सायन पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जैसवार (वय १७) याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. पोलिसांनी हा आरोप फेटाळला आहे. लेप्टोमुळे हा मृत्यू झाल्याचा त्यांचा दावा आहे. 

धारावीतील राजीव गांधीनगर येथे काही दिवसांपूर्वी मोबाईल चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी याच भागातील सचिनला संशयित म्हणून १३ जुलैला रात्री घरातून ताब्यात घेतले. सकाळी ८ वाजता सचिनला सोडू, असे त्याचा भाऊ सुनील याला पोलिसांनी सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात रात्री ८ वाजता त्याला सोडण्यात आले. पोलिस ठाण्यातून घरी जाताना सचिनच्या तोंडातून रक्त आल्यामुळे त्याची रुग्णालयात तपासणी करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी प्रकृती खालावल्यामुळे त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ मुलाच्या नातेवाईक व इतर नागरिकांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. काहींनी बॅरिकेट हटवून घुसण्याचा प्रयत्न केला. जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेकही केली. यात पोलिस शिपाई विनायक खंडागळे (३५), किशोर कदम (३१) यांच्यासह एमएसएसएफचे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले.

पोलिस ठाण्यावरही मोर्चा
सचिन जैसवार याचा मृतदेह विच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नागरिकांनी धारावी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Threw stones at police after the death of the accused