किरकोळ वादातून पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

पती-पत्नीत झालेल्या किरकोळ वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून, चाकूने वार केल्याची घटना सीबीडी सेक्‍टर- ८ परिसरात घडली. सुनील पवार असे पतीचे नाव असून सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

नवी मुंबई : पती-पत्नीत झालेल्या किरकोळ वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून, चाकूने वार केल्याची घटना सीबीडी सेक्‍टर- ८ परिसरात घडली. सुनील पवार असे पतीचे नाव असून सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील जखमी महिलेवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आरोपी सुनील पवार हा पत्नी व दोन मुलींसह सीबीडी सेक्‍टर- ८ भागात राहावयास असून, तो इस्टेट एजंटचा व्यवसाय करतो. मागील काही दिवसांपासून सुनील पवार याचे पत्नी मंदा हिच्याशी शुल्लक कारणावरून वाद होत होते. त्यामुळे सुनील पवार हा पत्नीला मारहाण करीत होता. गुरुवारी (ता. ७) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्याला जाणावरून या पती-पत्नीत वाद झाला. सुनीलने ठाण्याला जाऊ नये यासाठी मंदाने त्याला अडवल्याने त्याचा राग आल्याने त्याने रागाच्या भरात मंदला बेदम मारहाण करत तिच्यावर चाकूने हल्ला करून पलायन केले. या घटनेत मंदा जखमी झाल्याने तिला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मंदाने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सीबीडी पोलिसांनी सुनीलवर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Through the minor debate Husband's Knife on wife