तरुणाने भागवली स्वखर्चाने कातकरीवाडीची तहान

मुरलीधर दळवी
बुधवार, 9 मे 2018

मुरबाड (ठाणे) : वाढत्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकाव्या लागणाऱ्या नारीवली येथील कातकरी वाडीच्या लोकांना एका सहृदय तरुणाने स्वखर्चाने 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने कातकरी वर्गाची तहान भागली आहे.

सह्याद्री पर्वताच्या रांगेतील सिद्धगडच्या पायथ्याशी मुरबाड तालुक्यातील नारीवली हे गाव आहे या गावातील कातकरी वाडीला पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नारीवली गाव किंवा बांगरपाडा या ठिकाणाहून पाणी आणावे लागत होते उन्हाळ्यात त्यांची दमछाक होत होती.

त्यांची ही अवस्था पाहून नारीवली गावचे तरुण दिगंबर शंकर विशे यांनी आपल्या फार्म हाऊसला असलेल्या बोअरवेल मधील पाणी साठवण्यासाठी मोठी सिंटेक्स टाकी उभी करून त्यातून कातकरी लोकांना 24 तास मोफत पाणी देण्याची आज (ता. 9) पासून सोय केली आहे विशे यांच्या माणुसकीचे परिसरातून कौतुक होत आहे

Web Title: through self expenses he solves problem of water in katkarwadi

टॅग्स