वाघाची कातडी तस्करी; चौघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

खालापूर - वाघाच्या कातड्याची तस्करी केल्या प्रकरणी खालापूरच्या चौक गावातील चार जणांना कल्याण गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते; चौकशीनंतर दोघांना सोडण्यात आले आहे.

खालापूर - वाघाच्या कातड्याची तस्करी केल्या प्रकरणी खालापूरच्या चौक गावातील चार जणांना कल्याण गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते; चौकशीनंतर दोघांना सोडण्यात आले आहे.

खालापुरात चौल गावात गुरुवारी (ता. 17) दुपारी कल्याण गुन्हे शाखा पथकाने विशाल धनराज, सचिन म्हात्रे, प्रमोद हातमोडे, पोपेटा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी कुणालाही याची खबर लागू दिली नाही. दरम्यान, अनोळखी व्यक्तींसोबत गेलेला विशाल धनराज घरी न परतल्याने त्याचे अपहरण झाले असावे, अशी तक्रार देण्यासाठी स्थानिक पोलिसांत धाव घेतली. रात्री उशिरा प्रमोद आणि सचिनला घरी सोडल्यानंतर या कारवाईबाबत साऱ्यांना समजले. या प्रकरणात विशाल व पोपेटा यांची अधिक चौकशी सुरू आहे.

Web Title: tiger skin smuggling crime