वर्षभरात मुंबईत वाघ आणि सिंहाची डरकाळी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

मुंबई - वर्षभरात पुन्हा एकदा मुंबईतून वाघ, सिंहांची डरकाळी कानी पडणार आहे. वाघ, सिंहासह १५ प्राण्यांसाठी भायखळा येथील वीर जिजामाता प्राणिसंग्रहालयात १७ पिंजरे बांधण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात तो स्थायी समितीपुढे मांडण्यात येईल.

गेल्या वर्षी राणीच्या बागेत पेंग्विन आले. आता वर्षभरात या परदेशी पाहुण्यांच्या साथीला देशी प्राणी दाखल होतील. १० वर्षांपूर्वी येथील वाघ आणि बिबळ्याचा मृत्यू झाला होता. चार वर्षांपूर्वी सिंहिणीचा मृत्यू झाला. ‘दुसऱ्या टप्प्यात १७ पिंजरे बांधण्यात येतील. त्याच्या निविदा उघडण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच प्रस्ताव स्थायी समिती पुढे मांडण्यात येईल, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. पिंजऱ्यांसाठी १२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

जिराफ, कांगारू अन्‌ चित्ताही
वीर जिजामाता प्राणिसंग्रहालयाचा विकास तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यासाठी मफतलाल मिलचा सात एकरचा भूखंड वापरण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात परदेशी प्राणी आणण्यात येतील. त्यात जिराफ, कांगारू, चित्ता आदी प्राण्यांचा समावेश असेल.

Web Title: Tigers and lions dreaded in Mumbai during the year