Video : हाडं गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स

युकेमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीत टायगर चक्क शर्ट न घालता उभा आहे.
Video : हाडं गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स

मुंबई : सध्याचा मोस्ट फेव्हरेट आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याचा हाडे गोठवणाऱ्या थंडीतील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. Koo App या मायक्रोब्लाॅगिंग साईटवर शेअर केलेल्या या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

फिल्म इंडस्ट्रीत(film industry) फिटनेसच्या बाबतीत अतिशय पॅशनेट असलेल्या जाॅन अब्राहम, विद्युत जामवाल, सोनु सूद, अक्षय कुमार या मोजक्या स्टार्समध्ये टायगर श्रॅाफचेही नाव घेतले जाते. पीळदार शरीरयष्टी, रूबाबदार व देखणे व्यक्तिमत्व असलेला टायगर श्रॉफ म्हणजे युवा पिढीचा हाॅटकेक अॅक्टर आहे. आपल्या भूमिकेसाठी कुठलीही कसूर न सोडणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांमध्ये तो टाॅपवर आहे.

Video : हाडं गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स
आंबेगाव खुर्द मध्ये पाणी टंचाई ;महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त

या व्हायरल व्हिडिओ मध्ये टायगर कडाक्याच्या थंडीत शर्टलेस उभा आहे. 'गणपत' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे हे फोटो आहेत. युकेमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीत टायगर चक्क शर्ट न घालता उभा आहे. या छायाचित्रात बर्फही पडताना दिसत आहे. टायगरसोबत जॅकी भगनानीही दिसत आहे. फोटोला कॅप्शन देताना टायगरने जॅकीला 'बॉसमॅन' म्हणले आहे. टायगर ६ नोव्हेंबरपासून युकेमध्ये 'गणपत'चे शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात टायगर कृती सेननसोबत दिसणार आहे. २०१४ मध्ये आलेल्या 'हीरोपंती' सिनेमातून या जोडीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com